पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५४

कुशळ हे जन । छळीतील गुण तुझे गातां ॥ ३ ॥ मज
हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा
नको ॥ ४ ॥ तुका ह्मणे आतां दुरावितां जन । किंवा हे
मरण भलें दोन्ही ॥ ५ ॥

  २२२. दुर्बुद्धि ते मना । कदां नुपजो नारायणा ॥ १ ॥
आतां मज ऐसें करी । तुझे पाय चित्तीं घरीं ॥ २ ॥
उपजला भावो । तुमचे कृपें सिद्धी जावो ॥ ३ ॥ तुका
ह्मणे आतां । लाभ नाहीं यापरता ॥ ४ ॥

  २२३. नको सांडूं अन्न नको सेवू वन । चिंती
नारायण सर्व भोगीं ॥ १ ॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे
शीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ २ ॥ नको गुंपों
भोगी नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया
॥ ३ ॥ तुका ह्मणे नको पुसो वेळोवेळां । उपदेश वेगळा
उरला नाहीं ॥ ४ ॥

  २२४. काय दरा करील वन । समाधान नाहीं जव
॥ १ ॥ तरी काय तेथे असती थोडीं । काय जोडी
तयांसी ॥ २ ॥ रिघतां धांवा पेंवामध्यें । जोडे सिद्ध ते
ठायीं ॥ ३ ॥ काय भस्म करील राख । अंतर पाक नाहीं
तों ॥ ४ ॥ वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥ ५ ॥
तुका ह्मणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥ ६ ॥

  २२५. आह्मांवरीं धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच
वस्त्रे यत्न करूं ॥ १ ॥ शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ॥

________________________________________

१ सवा - कडे, पक्षी.