पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५१

निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥ ३ ॥ पापाचे
सांगाती । तोंडी ओढाळांचे माती ॥ ४ ॥ हिताचिया
नांवें । वोस पडिले देहभावें ॥ ५ ॥ फजीत करूनि सोडी ।
तुका करी बोडाबोडी ॥ ६ ॥

  २१०. आपुल्या विचार करीन जिवाशीं । काय या
जनाची चाड मज ॥ १ ॥ आपुलें स्वहित जाणती सकळ ।
निरोधितां बळे दुःख वाटे ॥ २ ॥ आइको नाइको कथा
कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥ ३ ॥ माझी
कोण वोज झाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां
लावू ।। ४ ॥ तुका ह्मणे भाकू आपुली करुणा । जयाची
वासना तया फळे ॥ ५ ॥

  २११. कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना
॥ १ ॥ शूर मिरवे रणांगणीं । मरणींच संतोष ॥ २ ॥
पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणें ॥ ३ ॥ तुका
ह्मणे उदारपणे । काय उणे मनाचें ॥ ४ ॥

  २१२. दर्पणासी बुजे । नकटें तोंड पळवी लाजें
॥ १ ॥ गुण ज्याचे जो अंतरीं । तोचि त्यासी पीडा करी
॥ २ ॥ चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥ ३ ॥
तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥ ४ ॥

  २१३. वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला
भले झणे क्षोभा ॥ १ ॥ कोण नेणे अन्न जीवाचे जीवन ।
__________________________________________

१ फजीत -विटंबना. २ बळे - बळाने प्रतिकार केला असतां.
३ वोजे - पाड, प्रभाव. माझ्या अंगी अशी कसली प्रतिष्ठा आहे
की स्वतांच्या अनुभवाने मी इतरांना मार्गदर्शक व्हावें
४ आपुली - मीच आपली. ५ विटे - खिन्न होतो.
६ क्षोभा -अशा बोलण्यानें, भले लोकहो, तुह्मी रागावू नका.