पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७

तप लाटिका तो जप । आळस निद्रा झोंप कथाकाळी
॥ ४ ॥ नाम नावडे तो करील बोहरी । नाहीं त्याची
खरी चित्तशुद्धि ॥ ५ ॥ तुका ह्मणे ऐसीं गर्जती पुराणें ।
शिष्टांची वचने मागिलाही ॥ ६ ॥

  १९४. जायांचे अंगुले लेतां नाहीं मान । शोभा नेदी
जन हांसविलें ॥ १ ॥ घुसळितां ताक कांडितां भूस ।
साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥ २ ॥ तुका ह्मणे नाहीं
स्वता भांडवल । भिकेचे ते फोल बीज नव्हे ॥ ३ ॥

  १९५. मुंगिचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां
गूळ धांव घाली ॥ १ ॥ याचकाविण काय खोळंबला दाता ।
तोचि धांवे हिता आपुलिया ॥ २ ॥ उदक अन्न काय
ह्मणे मज खा ये । भुकेला तो जाय चोजवीत ॥ ३ ॥
व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा
आपुलिया ॥ ४ ॥ तुका ह्मणे जया आपुलें स्वाहित ।
करणे तोचि प्रीत धरी कथे ॥ ५ ॥

  १९६. देव तीर्थी येर दिसे जया ओस । तोचि तया
दोष जाणतिया ॥ १ ॥ तया बरें फावे देवा चुकवितां ।
संचिताची सत्ता अंतराय ॥ २ ॥ शुद्धाशुद्ध ठाव पापपुण्य
बीज । पाववील दुजे फळभोग ॥ ३ ॥ तुका ह्मणे
विश्वभराऐसें वर्म । चुकलिया धर्म अवघे मिथ्या ॥ ४ ॥

  १९७. मस्तकीं सहावें टांकियासी जाण । तेव्हां
देवपण भोगावें गा ॥ १ ॥ आपुलिये स्तुती निंदा अथवा
मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ॥ २ ॥ सद्गुरुसेवन तेंचि

_______________________________________

१ अंगठी.