पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४६

  १९०. लेंकरा लेववी माता अलकार । नाहीं अंतपार
आवडीसी ॥ १ ॥ कृपेचें पोसणे तुमचें मी दीन । आजि
संतजन मायबाप ॥ २ ॥ आरुष उत्तरीं संतोषे माउली ।
कवळुनि घाली हृदयांत ॥ ३ ॥ पोटीं आलें त्याचे नेणे
गुणदोष । कल्याणची असे असावें हें ॥ ४ ॥ मनाची ते
चाली। मोहाचिये सोई । ओघे गंगा काई परतों जाणे
॥ ५ ॥ तुका ह्मणे कोठे उदार मेघा शक्ति । माझी तृषा
किती चातकाची ॥ ६ ॥

  १९१. सोनें दावी वरी तांबे तया पोटीं । खरियाचे
साटीं। विकू पाहे ॥ १ ॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचे
निवडी दोहींचे वेगळालें ॥ २ ॥ क्षीरा नीरा कैसें होय
एकपण । स्वादी तोच भिन्न भिन्न काढी ॥ ३ ॥ तुका
ह्मणे थीता नागवलाचि खोटा । अपमान मोटा पावईल ॥ ४ ॥

  १९२. थोडे परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥ १ ॥
घ्यावे जेणें नये तुटी । बीज वाढे बीजापोटीं ॥ २ ॥ चित्त
ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥ ३ ॥ आपलें तें
हित फार । तुका ह्मणे खरें सार ॥ ४ ॥

____
२९. उपदेशपर.

  १९३. लटिकें तें ज्ञान लटिकें तें ध्यान । जरि
हरिकीर्तन प्रिय नाहीं ॥ १ ॥ लटिकेंचि दंभ घातलें दुकान ।
चाळविलें जन पोटासाठीं ॥ २ ॥ लाटिकेंचि केले वेदपारायण ।
जरि नाहीं स्फुदने प्रेम कथे ॥ ३ ॥ लटिकें ते

_______________________________________

१ बरोबरीने. २ शुद्ध. ३ नादी लावलें. ४ कळवळा,