पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४४

चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥ ३ ॥ तुका
ह्मणे जन । देवा असे भाग्यहीन ॥ ४ ॥

  १८२. मुळााचिया मुळे । दुःखं वाढती सकळे ॥ १ ॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ २ ॥ न कळे
आवडी । कोण आहे कैसी घडी ॥ ३ ॥ तुका ह्मणे थित
दुःख पाववावें चित्त ॥ ४ ॥

  १८३. पर्जन्ये पडावे आपल्या स्वभावें । आपुलाल्या
दैवें पीके भूमि ॥ १ ॥ बीज तेंचि फळ येईल शेवटीं ।
लाभहानीतुटी ज्याची तया ॥ २ ॥ दीपाचिये अंगीं नाहीं
दुजा भाव। धणी चोर साव सारिखेचि ॥ ३ ॥ काउळे ढोंपरा
कंकर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळे ॥ ४ ॥ तुका
ह्मणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥ ५ ॥

  १८४. आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे
याति कुळ कयि कीजे ॥ १ ॥ उकरड्यावरी वाढली तुळसी ।
टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ २ ॥ गाईचा जो भक्ष अमंगळ
खाय । तिचे दुध काय सेवू नये ॥ ३ ॥ तुका ह्मणे काय
सलपटाशीं काज । फणसांतील बीज काढुन घ्यावें॥ ४ ॥
  १८५. वाईटानें भलें । हीने दाविलें चांगलें ॥ १ ॥
एकाविण एका । कैंचे मोल होते फुका ॥ २ ॥ विषे
दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥ ३ ॥ काळिमेने ज्योती
दिवस कळों आली राती ॥ ४ ॥ उंच निंच
गारा । हिरा परिस मोहरा ॥ ५ ॥ तुका ह्मणे भले । ऐसे
नष्ठांनीं कळले ।। ६ ।।

__________________________________

१ मनाला दुःख द्यावें हें व्यर्थ.