पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४३


दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी काम ॥ ३ ॥
तुका ह्मणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भौग
तिये ॥ ४ ॥

  १७७. साधने तरी हींच दोन्ही । जरी कोणी साधील
॥ १ ॥ परद्रव्य परनारी । यांचा धरी विटाळ ॥ २ ॥
देवभाग्ये घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥ ३ ॥ तुका
ह्मणे ते शरीर । गृह भांडार देवाचें ॥ ४ ॥

  १७८. लटिकें ते रुचे । साच कोणांही न पचे ॥ १ ॥
ऐसा माजल्याचा गुण | भोगें कळों येईल शीण ॥ २ ॥
वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥ ३ ॥ कांहीं न
मनी हेकड । तुका उपदेश माकड ॥ ४ ॥

  १७९. बरें जालीयाचे अवघे सांगाती । वाइटाचे
अंतीं कोणी नाहीं ॥ १ ॥ नोहे मातापिता नोहे कांता
सुत । इतरांची मात काय सांगों ॥ २ ॥ तुका ह्मणे जन
दुतोंडी सार्वज । सांपडे सहज तिकडे धरी ॥ ३ ॥

  १८०. परद्रव्य परनारी । अभिलाषुनि नाक धरी
॥ १ ॥ जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ २ ॥

  • सोंवळ्याची स्फीती । क्रोधे विटाळला चित्तीं ॥ ३ ॥ तुका

ह्मणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥ ४ ॥

_____
२८. बोधपर.

  १८१. दर्पणासि बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥ १ ॥
गुण ज्याचे जो अंतरीं । तोचि त्यासी पीडा करी ॥ २ ॥

__________________________________________


१ देवाचे वैभव. २ पशु, * ( सोहोळ्याची स्थिति. )