पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४२

हात तेथें ॥ १ ॥ काय तो तयाचा लेखावा अन्याये ।
हित नेणे काय आपुलें तें ॥ २ ॥ शुकें नळिकेशीं
गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥ ३ ॥ तुका
ह्मणे एक ऐसे पशु जीव । न चले उपाय कांहीं तेथें ॥ ४ ॥

  १७३. दुबळे सदैवा । ह्मणे नागवेल केव्हां ॥ १ ॥
आपणा ऐसें करूं त्या पाहे । स्वभावासी कारेल काये ॥ २ ॥
मूढ सभेआंत । इच्छी पंडिताचा घात ॥ ३ ॥ गांढे
देखुनियां शूरा । उगें करितें बुरबुरा ॥ ४ ॥ आणिकांचा
हेवा । न करीं शरण जाई देवा ॥ ५ ॥ तुका ह्मणे
किती । करू दुष्टांची फजिती ॥ ६ ॥

  १७४. हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥ १ ॥
मग तयाच्या आधारें । करणे अवघेचि बरें ॥ २ ॥ सुख
दुःख साहे । हर्षामर्षी भंगा नये ॥ ३ ॥ तुका ह्मणे जीवे ॥
आधीं मरोनि राहावें ॥ ४ ॥

  १७५. मृगाचिये अंगीं कस्तूरीचा वास । असे ज्याचा
त्यास नसे ठावा ।। १ । भाग्यवंत घेती वेंचूनियां मोलें ।
भारवाही मेले वाहतां वोझें ॥ २ ॥ चंद्रामृतें तृप्ति पारणे
चकोरा । भ्रमरासी चार सुगंधाचा ॥ ३ ॥ अधिकारी येथे
घेती हातवटी । परीक्षवंता दृष्टीं रत्न जैसें ॥ ४ ॥ तुका
ह्मणे काय अंधळिया हातीं । दिलें जैसें मोती वांयां जाय ॥ ७ ॥ <

  १७६. कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर )
सकळ भोगतसे ।। १ ॥ तैसे तुज ठावें नाहीं तुझे नाम । <br आह्मीच ते प्रेमसुख जाणों ॥ २ ॥ माते तृण बाळा

_______________________________________

१ आनंदात विसर पडू देऊ नये, १ भोजन,