पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४१

  १६८. शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची
त्यास काय गोडी ॥ १ ॥ तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड।
न लगे त्यां गोड परमार्थ ॥ २ ॥ श्वानासी भोजन दिलें
पंचामृत । तरी त्याचे चित्त हाडावरी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
सर्प पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष झालें ॥ ४ ॥

  १६९. दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा
समाधि विश्वरूपीं ॥ १ ॥ काय त्याचे वांयां गेलें तें एक ।
सदा प्रेममुख सर्वकाळ ॥ २ ॥ तीर्थ देव दुरी तया
भाग्यहीना । विश्व त्या सजना दुमदुमलें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
एक वाहाती मोळिया । भाग्ये आगळिया घरा येती ॥ ४ ॥

  १७०. तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या
पंचानना देखिले नाहीं ॥ १ ॥ तोंवरि तोंवरि सिंधु करि
गर्जना । जंव त्या अगस्तैि ब्राह्मणा देखिलें नाहीं ॥ २ ॥
तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जव परमाईचा पुत्र
दृष्टी देखिला नाहीं ॥ ३ ॥ तोंवरि तोंवरि माळामुद्रांची
भूषणें । जंव तुक्याचे दर्शन जालें नाहीं ॥ ४ ॥

  १७१. तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाही
हिरा प्रकाशला ॥ १ ॥ तोंवरि तोंवरि शोभती दीपिका ॥
नुगवतां एका भास्करासी ॥ २ ॥ तोंवरि तोंवरि सांगती
संतांचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुक्यासवें ॥ ३ ॥

  १७२. माकडें मुठीं धरिले फुटाणे । गुंतले ते नेणे

__________________________________________

१ भाग्यहीनाला एक दोन सिद्धी प्राप्त होतात-नुसते वक्तृत्व
प्राप्त होते. परंतु भाग्यवंतांना विश्वाशी तन्मयता, प्राप्त होते.
२ अगस्त ऋषीने आचमन करून समुद्र पिऊन टाकला होता.