पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४०

  १६३. गुळे माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला
लोकाचारीं ॥ १ ॥ अंतरीं विषयाचे लागलें पैं पिसें ।
बाहिरल्या वेषे भुलवी लोकां ॥ २ ॥ ऐशिया दांभिका कैंची
हरिसेवा । नेणेचि सद्भावा कोणेकाळीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे
येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधे ॥ ४ ॥

  १६४. होउनी जंगम विभूति लाविती । शंख
वाजविती घरोघरीं ॥ १ ॥ शिवाचे निर्माल्य तीर्थ न सेविती ।
घंटा वाजविती पोटासाठीं ॥ २ ॥ तुका ह्मणे त्यांसी नाहीं
शिवभक्ति । व्यापार करिती संसाराचा ॥ ३ ॥

  १६५. भोंदावया मीस घेऊनि संताचें । करी कुटुंबाचे
दास्य सदा ।। १ ॥ मनुष्याचे परी बोल रावा करी । रंजवी
नरनारी जगामध्ये ॥ २ ॥ तिमयाचा बैल करी शिकविलें ।
चित्रींचे बाहुले गोष्टी सांगे ॥ ३ ॥ तुका ह्मणे देवा जळो
हे महंती । लाज नाहीं चित्ती निसुगातें ॥ ४ ॥

  १६६. मुखें सांगे ब्रह्मज्ञान । जन लोकाची कापितो
मान ॥ १ ॥ ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी
॥ २ ॥ कथा करितो देवाची । अंतरीं आशा बहु लोभाची
॥ ३ ॥ तुका ह्मणे तोचि वेडा । त्याचे हाणून थोबाड फोडा ॥ ४ ॥


_____
३७० दृष्टान्तपर.

  १६७. लोहो परिसाशीं रूसलें । सोनेंपणासी मुकले
॥ १ ॥ येथें कोणाचें काय गेलें । ज्याचें तेणें अनहित
केलें ॥ २ ॥ गंगा आली आळश्यावरी । आळशी देखोनि
पळे दूरी ॥ ३ ॥ गांवा खालील ओहळे । रागें गंगेसी न मिळे
॥ ४ ॥ तुका केशवाचा दास । गुरूसी न भजे शिष्य ॥ ५ ॥