पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३९

आपले ते रंग दावीतसे ॥ ३ ॥ तुका ह्मणे नये पाकासी
दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥ ४ ॥

  १५३. भुंकुनियां सुने लागे हस्तीपाठीं । होऊनि
हिंपुटी दुःख पावे ॥ १ ॥ काय त्या मशके तयाचें करावें ।
आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ २ ॥ मातले बोकड विटवी
पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥ ३ ॥ तुका ह्मणे संतां
पीडितील खळ । घेती तोंड काळे करूनियां ॥

_____
२६. ढोंगी लोक.

  १५४. लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडे घेऊनि
क्रोधं चाले ॥ १ ॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला ।
ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ २ ॥ सेवी भांग अफू तमाखू
उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥ ३ ॥ तुका ह्मणे ऐसा
सर्वस्वे बुडला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥ ४ ॥

  १५५. संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं
॥ १ ॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरी
॥ २ ॥ कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाावती विरक्ती
॥ ३ ॥ आशापाशीं बांधोनि चित्त । ह्मणती झाले आह्मी
मुक्त ॥ ४ ॥ त्यांचे लागले संगती । जाली त्यांची तेचि गति
॥ ५ ॥ तुका ह्मणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें ॥ ६ ॥

  १५६. ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि ह्मणती साधु
॥ १ ॥ अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनि करिती पाप
॥ २ ॥ दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा
॥ ३ ॥ तुका ह्मणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥ ४ ॥