पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३७

अंतर विटाळसें ॥ १ ॥ तैसे कुजनाचे जिणे अभंगळ ।
घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ २ ॥ कडु भोंपळ्याचा
उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
विष साहू नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥ ४ ॥

  १४९. काय ढोरापुढें घालुनि मिष्टान्न । खरा विलेपन
चंदनाचें ॥ १ ॥ नको नको देवा खळाची संगती । रस
ज्या पंगती नाहीं कथे ॥ २ ॥ काय सेज बाज माकडा
विलास । अळंकारा नास करूनि टाकी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥ ४ ॥

  १५०. निंबाचिया झाडा साकरेचें आळे । आपली ती
फळे न संडीच ॥ १ ॥ तैसे अधमाचें अमंगळ चित्त ।
वमन तें हित करूनि सांडी ॥ २ ॥ पारिसाचे अंगीं
लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
वेळू चंदनासंगतीं । काय ते नसती जवळिक ॥ ४ ॥

  १५१. कावळ्याच्या गळां मुक्ताफळ माळा । तरी काय
त्याला भूषण शोभे ॥ १ ॥ गजालागी केला कस्तूरीचा लेप ।
तिचे तो स्वरूप काय जाणे ॥ २ ॥ बकापुढे सांगे
भावार्थवचन । वाउगाची सीण होय त्यासी ॥ ३ ॥ तुका ह्मणे तैसे
अभाविक जन । त्यांसी वायां सीण करूं नये ॥ ४ ॥

  १५२. काय वृंदावन मोहियेलें गुळे । काय जिरें काळे
उपचारिलें ॥ १ ॥ तैसी अधमाची जातीच अधम । उपदेश
श्रम करावा तो ॥ २ ॥ न कळे विंचासी कुरवाळिलें अंग ।

____________________________________________

१ सांडीचे, २ मोतीं. ३ ढोंगी, ३४ माखलें,