पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३६

उठवी कपाळ संघष्टणें ॥ २ ॥ सप मंत्र चालै धरावया
हातीं । खळाची ते जाती निखळची ॥ ३ ॥ तुका ह्मणे
कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखव्याची ॥ ४ ॥

  १४४. आणिकांच्या घातें । ज्यांची निवतील चित्तें
॥ १ ॥ तेचि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ २ ॥
कान पसरोनि । ऐके वदे दुष्ट वाणी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥ ४ ॥

  १४५. आणिकांच्या कापिती माना । निरुष्ठुरपणा पार
नाहीं ॥ १ ॥ करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया
॥ २ ॥ सेंदराचे दैवत केलें । नवस बोले तयासी ॥ ३ ॥
तुका ह्मणे नाचती पोरें । खोडितां येरे अंग दुखें ॥ ४ ॥

  १४६. ज्यासी विषयाचें ध्यान । त्यासी कैंचा नारायण
॥ १ ॥ साधु कैंचा पापीयासी । काय चांडाळासी काशी
॥ २ ॥ काय पतितासी पिता । काय अधमासी गीता ॥ ३ ॥
तुका ह्मणे निरंजनीं । शठ कैंचा ब्रह्मज्ञानी ॥ ४ ॥

  १४७. रासभ धुतला महा तीर्थामाजी । नव्हे जैसा
तेजी शामकर्ण ॥ १ ॥ तेवीं खळा काय केल्या उपदेश ।
नव्हेचि मानस शुद्ध त्याचें ॥ २ ॥ सर्पासी पाजिलें
शर्करापीयूष । अंतरींचे विष जाऊ नेणें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
श्वाना क्षीरीचे भोजन । सवेंचि वमन जेवीं तया ॥ ४ ॥

  १४८. कावळियासी नाहीं दया उपकार । काळिमा

__________________________________________

१ ह्मसोबा बिरोबा इत्यादि दैवतांना कोंबडीं बकरी यांचे नवस br करतात त्या विषयीं. २ दुस-यांनी त्यांना खोटें केलें असतांना त्यांचे कपाळ उठते.