पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३५

करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥ ३ ॥ तुका ह्मणे त्याच्या
तोंडा लागो कांटी । नाहीं जया चित्तीं जगजेठी ॥ ४ ॥

  १४०. निंदक तो परउपकारी । काय वर्णू त्याची
थोरी । जो रजकाहुनि भला परि । सर्व गुणें आगळा ॥ १ ॥
नेघे मोल धुतो फुका । पाप वरच्यावरी देखा । करीतसे
साधका । शुद्ध सरते तिहीं लोकीं ॥ २ ॥ मुखसवंदणी
सांगाते । अवघे सांटविलें तेथें । जिव्हा साधण निरुते ।
दोष काढा जन्माचे ॥ ३ ॥ तया ठाव यमपुरीं । वास
करणे अघोरी । त्यासी दंडण करी । तुका ह्मणे न्हाणी ते ॥ ४ ॥

  १४१. असो खळ ऐसे फार । आह्मां त्यांचे उपकार
॥ १ ॥ करिती पातकांची धुणी । मोल न घेतां साबणी
॥ २ ॥ फुकाचे मजूर । ओझे वागविती भार ॥ ३ ॥
पार उतरुन ह्मणे तुका । आह्मां आपण जाती नरका ॥ ४ ॥

  १४२. भाव धरी तया तारीला पाषाण । दुर्जना
सज्जन काय करी ॥ १ ॥ करितां नव्हे नीट श्वानाचे हे
पुच्छ । खापरा परिस काय करी ॥ २ ॥ काय करील तया
साकरेचे आळे । बीज तैसीं फळे येती तया ॥ ३ ॥ तुका
ह्मणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥ ४ ॥

  १४३. दुर्जनाचे अंग अवघेचि सरळ । नर्काचा
कोथळ सांटवण ॥ १ ॥ खाय अमंगळ बोले अमंगळ ।

_______________________________________

१ धोब्याचे धुण्याचे पात्र. मेरी. २ त्याला ( दंडण ) 

शिक्षा ह्मटली ह्मणजे तुका ह्मणे ते न्हाणी पाप धुण्याची
जागा असे समज. किंवा-त्यासी दंड न करी तुका ह्मणे
ती मोरी, मळ धुण्याची जागा होय. किंवा ज्याला तो
ताडण करतो त्याची तो मोरी होऊन बसतो.