पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३४


लक्षणें । नाक नाहीं नेणें वांयां गेलीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे
अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी संवसर्गे ॥ ४ ॥

  १३६. कुतऱ्या ऐसें ज्याचे जिणें । संग कोणीं न
करीजे ॥ १ ॥ जाय तिकडे हाडहाडी । गोऱ्हवाडीच सोइरीं
॥ २ ॥ अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशे
॥ ३ ॥ तुका ह्मणे कैंची लवी । डेंग्या केवीं अंकुर ॥ ४ ॥

  १३७. दुष्टाचे चित्त न भिने अंतरीं । जरी जन्मवरी
उपदेशिला ॥ १ ॥ पालथे घागरीं घातलें जीवन । न
घरीच जाण तेही त्याला ॥ २ ॥ जन्मा येउनि तेणें
पतनचि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा ॥ ३ ॥
जळो जळो हे त्याचे झालेपण । कासया हे आले संवसारा
॥ ४ ॥ पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहतां अंतरीं
कोरडा तो ॥ ५ ॥ कुचर मुग नयेचि पाका । पाहतां
सारिखा होता तैसा ॥ ६ ॥ तुका ह्मणे असे उपाय
सकळां । न चले या खळा प्रयत्न कांहीं ॥ ७ ॥ ह्मणऊनि
संग न करितां भला । धरितां अबोला सर्वहित ॥ ८ ॥

  १३८. भुंकती ती द्यावी भुकों । आपण त्यांचे नये
शिकों ॥ १ ॥ भाविकांनी दुर्जनाचे । मानू नये कांहीं
साचें ॥ २ ॥ होइल तैसे बळ । फजीत करावे ते खळ
॥ ३ ॥ तुका ह्मणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥ ४ ॥

  १३९. पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी
भगवंतावरी बोल ॥ १ ॥ भेईना करितां पापाचे डोंगर ।
दुर्जन पामर दुराचारी ॥ २ ॥ नाठवी तो खळ आपुली

________________________________________

१ ठेंग्या - सोडग्याला