पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३०


  ११८. दह्यांचिया अंगीं निघे तक लोणी । एका
मोले दोन्ही मागों नये ॥ १ ॥ आकाशाचे पोटीं चंद्र
तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ २ ॥ पृथ्वीच्या पोटी
हीरा गारगोटी । दोहींसी संसाटी करूं नये ॥ ३ ॥ तुका
ह्मणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजू नये ॥ ४ ॥

  ११९. मऊ मेणाहूनी आह्मी विष्णुदास । कठिण
वज्रास भेदूं ऐसे ॥ १ ॥ मेले जित असों निजलियां जागे ।
जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ २ ॥ भले तरी देऊ
कंबरेची लंगोटी । नाठ्याळाचे काठी देऊं माथां ॥ ३ ॥
मायबापाहून बहु मायावंत । करूं घातपात शत्रुहूनि ॥ ४ ॥
अमृत ते काय गोड आह्मांपुढे । विष ते बापुडे कडू किती
॥ ५॥ तुका ह्मणे आह्मी अवघेचि गोड । ज्याचे पुरे कोड
त्याचेपरि ॥ ६ ॥

  १२०. अमृताची फळे अमृताची वेली । तोचि पुढें
चाली बीजाचीही ॥ १ ॥ ऐसियांचा संग देई नारायणा ।
बोलावा वचना जयाचिया ॥ २ ॥ उत्तम सेवन सितळ
कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
तैसें होईजेत संगे । वास लागे अंगें चंदनाच्या ॥ ४ ॥

  १२१. पवित्र सोंवळीं । एक तीच भूमंडळीं ॥ १ ॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ २ ॥ तीच
भाग्यवंतें । सरतीं पैरतीं धनवित्तें ॥ ३ ॥ तुका ह्मणे देवा ।
त्यांची केल्या पावे सेवा ॥ ४ ॥

  १२२. मुखें बोले ब्रह्मज्ञान। मनीं धन अभिमान ॥ १ ॥

____________________________________________


१ साम्य. १ परिपूर्ण.