पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१


ऐशियाचि करितां सेवा । काय सुख होय जीवा ॥ २ ॥
पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥ ३ ॥ विरळा ऐसा
कोणी । तुका त्यासी लोटांगणीं ॥ ४ ॥

  १२३. आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता
पिता तयाचिया ॥ १ ॥ कुळीं कन्यापुत्र होती जीं सात्विक ।
तयाचा हरिख वाटे देवा ॥ २ ॥ गीता भागवत करिती
श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥ ३ ॥ तुका ह्मणे मज
घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥ ४ ॥

  १२४. संतांच्या धिक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु
तेणें सांडी परी ॥ १ ॥ कुळ आणि रूप वांयां संसार ।
गेला भरतौर मोकलितां ॥ २ ॥ मूळ राखे तया फळा
काय उणें । चतुर लक्षणे राखों जाणे ॥ ३ ॥ तुका ह्मणे
सायास तो एके ठायीं । दीप हातीं तई अवघे बरें ॥ ४ ॥

  १२५. नाहीं संतपण मिळत हें हाटीं । हिंडतां
कपाटीं रानीं वनीं ॥ १ ॥ नये मोल देतां धनाचिया
राशी । नाहीं तें आकाश पाताळीं तें ॥ २ ॥ तुका ह्मणे
मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥ ३ ॥

___


२५ दुर्जन.

  १३६. आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा
त्यासमान ॥ १ ॥ दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं
ज्याच्या नाका ॥ २ ॥ तुका ह्मणे तैसा खळा । उपदेशाचा
कंटाळा ॥ ३ ॥

_______________________________________


१ आनंद. २ विश्वशत्रु जेणे परी तेणें परी तो सांडी = विश्वशत्रु समजून
 त्याचा त्याग करावा. ३ नवरा. ४ दारोदार.