पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२६

वैखरी ॥२॥ कथा करी वरिवरी । प्रेम नसेचि अंतरीं ॥ ३ ॥
तुका ह्मणे कवित्व करी । मान वस्तु हे आदरी ॥ ४ ॥

  १०२. नका दंतकथा येथे सांगों कोणी । कोरडे
ते मानी बोल कोण ॥ १ ॥ अनुभव येथे पाहिजे साचार ।
न चलती चार आह्मांपुढे ॥ २ ॥ निवडीं वेगळे क्षीर आणि
पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे येथे
पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें नाहीं काम* ॥ ४ ॥

  १०३. मांडे पुऱ्या मुखें सांगों जाणे मात । तोंडी
लाळ हात चोळी रिते ॥ १ ॥ ऐसियाच्या गोष्टी फिक्या
मिठेविण । रुचि नेदी अन चवी नाहीं ॥ २ ॥ बोलों जाणें अंगीं
नाहीं शूरपण । काय ते वचन जाळावें तें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
बहु तोंडे जे वाचाळ । तेग तेंचि मूळ लटिक्यांचें ॥ ४ ॥


_____
२३. भूतांच्या ठायीं ईश्वर.

  १०४. भूतीं देव ह्मणोनि भेटतों या जना । नाहीं हे
भावना नरनारी ॥ १ ॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा ।
नलगे द्यावा साचा परिहार ॥ २ ॥ दयेसाठी केला उपाधिपसारा
जड जीवा तारा नाव कथा ॥ ३ ॥ तुका ह्मणे नाहीं
पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां ॥ ४ ॥

  १०५. विश्व विश्वंभर । बोले वेदांताचे सार ॥ १ ॥
जगी जगदीश । शास्त्रें वदती सावकाश ॥ २ ॥ व्यापिलें
हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ ३ ॥ जनीं जनार्दन |

__________________________________________


  • (काय काम.) १ तुका ह्मणे जे वाचाळ बहु तोंडे ते त्यांचे

बडबडणे खोट्याचे मूळ, तेंग-हिंग-तोंडी लावणे.