पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२५

आयुष्यासी ॥ ४ ॥ तुका ह्मणे वांयां गेलों ऐसा दिसें । होईल
या हांसे लौकिकांचे ॥ ५ ॥

  ९७. बोलविसी तैसें आणी अनुभवा । नाहीं तरी
देवा विटंबना ॥ १ ॥ मिठेविण काय करावें मिष्टान ।
शव जीवेंवीण शृंगारिलें ॥ २ ॥ संपादणीविण विटंबिलें
सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥ ३ ॥ कन्यापुत्रेविण
मंगलदायके । वेचिलें हे फिके द्रव्य तरी ॥ ४ ॥ तुका
ह्मणे तैसी होते मज परी । न देखें अंतरीं प्रेमभाव ॥ ५ ॥

  ९८. जैसे दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी
आहे ॥ १ ॥ दुःख पावायाचे मूळ । रहणी ठाव नाहीं
ताळ ॥ २ ॥ माळमुद्रांवरी । कैंचा सोंगे जोडे हरि ॥ ३ ॥
तुका ह्मणे देखें । ऐसे परीची बहुतेकें ॥ ४ ॥

  ९९. बोले तैसा चाले। त्याची वंदीन पाउलें ॥ १ ॥
अंगें झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥ २ ॥ त्याचा
होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥ ३ ॥ तुका
ह्मणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥ ४ ॥

  १००. बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे
॥ १ ॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ २ ॥
विष खावे ग्रासोग्रासीं । धन्य तोचि एक सोसी ॥ ३ ॥
तुका ह्मणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥ ४ ॥

  १०१. ब्रह्मज्ञानाची भरोवरी । पुढिला सांगे आपण
न करी ॥ १ ॥ थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी

___________________________________________

१ लोकांचे. २ तो केवळ देव. ३ अंग.