पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२४


झाला संन्निपात ॥ २ ॥ कामिनी जयाच्या जाहाली
नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥ ३ ॥ तुका ह्मणे
मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥ ४ ॥

  ९४. माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता तो
निराळा वरील सारी ॥ १ ॥ एका रस एका तोंडी पडे
माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ २ ॥ सुनियांसी
क्षीर चारिल्या ओकवी । भोक्ता तो सेवी धणीवरी ॥ ३ ॥
तुका ह्मणे मूर्ख वागविती भार । नेतील तें सार
परीक्षक ॥ ४ ॥

  ९५. नमस्कारी भूते विसरोनि याती । तेणें
आत्मस्थिती जाणीतली ॥ १ ॥ परउपकारी वेचियल्या शक्ती ।
तेणें आत्मास्थिती जाणीतली ॥ २ ॥ द्वैताद्वैतभाव नाहीं
जया चित्तीं । तेणें आत्मस्थिति जाणीतली ॥ ३ ॥
जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मस्थिती
जाणीतली ॥ ४ ॥ उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव
भक्ति मानव तो ॥ ५ ॥ तुकयाबंधु ह्मणे वरकड ते येर ।
संसाराचे खर भारवाही ॥ ६ ॥

२२. बोलणे आणि आचरण.

  ९६. ह्मणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी
दोन्ही भिन्न भाव ॥ १ ॥ गातों नाचतों ते दाखवितों
जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ २ ॥ पाविजे ते वर्म
न कळेचि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥ ३ ॥
भांडवल काळें हातोहाती नेलें । माप या लागले