पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३


२१. आत्मस्थिति.

  ८९. अंगीं ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर
गोडी जाणे ॥ १ ॥ एकाचिये तोंडी पडली ते माती ।
अवघे ते खाती पोटभरी ॥ २ ॥ चारितां बळे येत असे
दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥ ३ ॥ तुका ह्मणे नसे
संचित हें बरें । तयासि दुसरे काय करी ।। ४ ।।

____

  ९०. आंधळ्यास जन अवघेचि आंधळे । आपणासि
डोळे दृष्टी नाहीं ॥ १ ॥ रोग्या विषतुल्य लागें हें मिष्टान्न
तोंडासी कारण चवी नाहीं ॥ २ ॥ तुका ह्मणे शुद्ध नाहीं
जो आपण । तया त्रिभुयन अवघे खोटें ॥ ३ ॥

  ९१. न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पतिमेळ
हाकारुनि ॥ १ ॥ अंतरींचें धांवें स्वभावें बाहेरी। धरितांही
परी आवरेना ॥ २ ॥ सूर्य नाहीं जागे करीत या जना ।
प्रकाश किरणा कर म्हूण ॥ ३ ॥ तुका ह्मणे मेघ नाचवी
मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥ ४ ॥

  ९२. चंदन तो चंदनपणें । सहजगुणें संपन्न ॥ १ ॥
वेधलिया धन्य जाती भाग्यें होती सन्मुख ॥ २ ॥ परिसाअंगीं
परिसपण । वाणोनि ते राहिलें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
कैंची खंती । सुजाती ते टाकणी ॥ ४ ॥

  ९३. जेवीं नवज्वरें तापले शरीर । लागे तया क्षीर
विषतुल्य ॥ १ ॥ तेवीं परमार्थ जीही दुराविला । तयालागीं

____________________________________________

१ तुका ह्मणे अशाला खंती कशाची ते आपल्या जातीचा उत्तम
गुण टाकीत नाहीत.