पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१९

मने प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मर्ने इच्छा
पुरविली । मन माउली सकळांची ॥ २ ॥ मन गुरु आणि
शिष्य । करी आपुलेंच दास्य । प्रसन्न आपआपणास ।
गति अथवा अधोगति ॥ ३ ॥ साधक वाचक पंडित ।
श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आन* दैवत । तुका
ह्मणे दुसरें ॥ ४ ॥

  ७२. फजितखोरा मना किती तुज सांगों । नको
कोणा लगों मागे मागें ॥ १ ॥ स्नेहवादें दुःख जडलेंसे
अंगीं । निष्ठुर हे जग प्रेमसुख ॥ २ ॥ निंदा स्तुति कोणी
करो दया माया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥ ३ ॥
योगिराज कां रे न राहाती बैसोनि । एकिये आसनीं याचि
गुणें ॥ ४ ॥ तुका ह्मणे मना पाहें विचारून । होई रे
कठिण वज्राऐसें ॥ ५ ॥

  ७३. गति अधोगति मनाची हे युक्ती । मन लावी
एकांतीं साधुसंगें ॥ १ ॥ जतन करा जतन करा । धांवते
सैरा ओढाळ तें ॥ २ ॥ मान अपमान मनाचे लक्षण
लाविलिया ध्यान तेंचि करी ॥ ३ ॥ तुका ह्मणे मन
उतरी भवासिंधु । मन करी बंधु चौ-याशींचा ॥ ४ ॥

  ७४. साहोनियां टांकीधाये । पाषाण देवचि जाला
पाहें ॥ १ ॥ तया रीति दृढ मन । करीं साधाया कारण
॥ २ ॥ बाण शस्त्र साहे गोळी । शूरा ठाव उंच स्थळीं
॥ ३ ॥ तुका ह्मणे सती । अग्नि न देखे ज्या रीती ॥ ४ ॥

  ७५. फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥ १ ॥

______________________________________________

  • ( आनु ).