पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१८

काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ २ ॥ लोह
लागे परिसा अंगीं । तोही भूषण जाला जगीं ॥ ३ ॥
सरिता ओहळ ओघा। गंगे मिळोनि झाल्या गंगा ॥ ४ ॥
चंदनाच्या वासें । तरु चंदन झाले स्पर्शे ।। ५ ।। तुका
जडला संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं ॥ ६ ॥

१८. एकान्त.

६९. संगें वाढे सण न घडे भजन । त्रिविध हें जन
बहु देवा ॥ १ ॥ याचिमुळे आला संगाचा कांटाळा ।
दिसताती डोळां नानाछंद ॥ २ ॥ एकविध भाव रहावया
ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥ ३ ॥ शब्दज्ञानी हित
नेणती आपुलें । आणकि देखिलें नावडे त्यां ॥ ४ ॥ तुका
ह्मणे आतां एकलेंचि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥ ५ ॥

  ७०. वृक्ष वल्ली आह्मां सोयरी वनचरें । पक्षी ही
सुस्वरें आळविती ॥ १ ॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ २ ॥ आकाश मंडप पृथिवी
आसन । रमे येथे मन क्रीडा करी ॥ ३ ॥ कंथाकमंडलु
देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥ ४ ॥ हरिकथा
भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवू रुची ॥ ५ ॥
तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद
अपणांसी ॥ ६ ॥

_____
१९. मन.

७१. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ॥
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥ १ ॥