पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१७


भूतांचि ते दया । आत्मस्थिति तया अंगीं वसे ॥ ३ ॥
न बोले गुण दोष नाइके जो कानीं । वरतोनि तो जनी
जनार्दन ॥ ४ ॥ तुका ह्मणे वर्म जाणियल्याविण । पावे
करितां सीण सांडीमांडी ॥ ६ ॥

  ६९. जेणे वाढें अपकीर्ति । सर्वार्थी ते त्यजावें ॥ १ ॥
सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ २ ॥ होइजेतें
शुद्ध त्यागें । वाउगें तें सारावें ॥ ३ ॥ तुका ह्मणे खोटें वर्म ।
निंद्य कर्म काळिमा ॥ ४ ॥

____
१७. संगति.

६६. ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगे नाडला
साधु तैसा ॥ १ ॥ ओढाळाच्या संगें सात्विकें* नासलीं ।
क्षण एक नाडली समागमें ॥ २ ॥ डांकाचे संगती सोने
हीन झालें । मोल ते तुटलें लक्ष कोडी ॥ ३ ॥ विषाने
पक्वानें गोड कडू झालीं । कुसंगाने केली तैसी परी ॥ ४ ॥
भावें तुका ह्मणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा
चौऱ्याशीचा ॥ ५ ॥

{gap}} ६७. कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके
कैसी सरी ॥ १ ॥ लोखंडाचे अंगीं लागतां परिस । तया
आणिकास कैसी सरी ॥ २ ॥ तुका ह्मणे मी न वजें
यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ३ ॥

  ६८. अग्निमाजी गेले । अग्नि होऊन तेच ठेलें ॥ १ ॥

_______________________________________________

( * सात्विक ) १ मी जातीवर न जातां जे खरे भक्त आहेत
त्यांना पूज्य समजतों.