पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५

॥ ४ ॥ तुका ह्मणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंथरिनाथा
लावियेलें ॥ ५ ॥

  ५७. अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥ १ ॥
येथें नसतां वियोग । लाभा उणे काय मग ॥ २ ॥ संग
हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥ ३ ॥ तुका
ह्मणे हरिच्या दासा । शुभकाळ अवघ्या दिशा ॥ ४ ॥

  ५८. ब्रह्मचारीधर्म घोकावें अक्षर । आश्रमी विचार
षटकर्मे ॥ १ ॥ वानप्रस्थ तरी संयोगी वियोग । संन्यास
तो त्याग संकल्पाचा ॥ २ ॥ परमहंस तरी जाणे सहज
वर्म । तेथें याति धर्म कुळ नाहीं ॥ ३ ॥ बोले वर्म जो
चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥ ४ ॥
तुका ह्मणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख
पावे ॥ ५ ॥

  ५९. आपुलें वेचून खोडा घाली पाव । ऐसा तो हा
जीव हीनबुद्धि ॥ १ ॥ विषयांच्या संगें आयुष्याचा नाश
पडियेलें ओस स्वहिताचें ॥ २ ॥ भुलल्याचे अंग आपणा
पारिखें । छंदाच सारिखें वर्ततसे ॥ ३ ॥ तुका ह्मणे
दुःख उमटें परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥ ४ ॥

  ६०. नव्हे ब्रह्मचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें
देशत्यागें ॥ १ ॥ काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें
ते धीरे आचावाचा ॥ २ ॥ कांपवूनि टिरी शूरत्वाची

___________________________________________

१.तुजसी- मी या भांडवलाने पूर्ण असून ते मी तुजकडे लाविले आहे.
२. शुचिर्भूत- शुद्ध.
३. शटकर्मे- १ यजन २ याजन ३ अध्ययन ४ अध्यापन
 ५ दान ६ प्रतिग्रह, हीं शट्र्कर्मे होत
  ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ व संन्यास, हे चार आश्रम,
४. कामी - इच्छेच्या ठायीं. ५. अंग,