पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४

  ५३. अन्यायासी राजा जरि न करी दंड । बहुच ते
लंड पीडिती जना ॥ १ ॥ न करी निगा कुणबी न
काढितां तण । कैंचे येती कण हातास ते ॥ २ ॥ तुका
ह्मणे संतां करूं नये अनुचित । पाप नाहीं नीत
विचारितां ॥ ३ ॥

  ५४. पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन
काय वेचे ॥ १ ॥ न करितां परनिंदा परद्रव्य अभिलाष ।
काय तुमचे यास वेचे सांगा ॥ २ ॥ बैसलिये ठायीं ह्मणतां
रामराम । काय हो श्रम ऐसे सांगा ॥ ३ ॥ संतांच्या वचनी
मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ ४ ॥
खरे बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास तुमचें
सांगा ॥ ५ ॥ तुका ह्मणे देव जोडे याजसाठीं । आणीक
ते आटी न लगे कांहीं ॥ ६ ॥

  ५५. विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी
सोंवळा तो ॥ १ ॥ गद्ये पद्ये कांहीं न धरावी उपाधी ।
स्वाधीनचि बुद्धि करुनी ठेवा ॥ २ ॥ विचाराचें कांहीं
करावें स्वहित । पापपुण्यातीत भांडवल ॥ ३ ॥ तुका ह्मणे
न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वभरी सारिखोंच ॥ ४ ॥

  ५६. कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय
त्यांचे उणे असे ॥ १ ॥ काय पापपुण्य पाहों आणिकांचे ।
मज काय त्यांचे उणे असे ॥ २ ॥ नष्टदुष्टपण कवणाचे
वाणुं । लयाहून अणु अधिक माझे ॥ ३ ॥ कुचर खोटा
मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये

__________________________________________


१.तण- गवत, २. कण- धान्य, ३. पद्ये- विद्येसंबंधी.