पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३


१६. नीति.

  ४९. ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजां ॥ १ ॥
चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ २ ॥
त्याचियाने दुःखी मही । भार तेही न साहे ॥ ५ ॥ तुका
ह्मणे ग्रामपशु । केला नाशु आयुष्या ॥ ४ ॥

  ५०. नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी
बुद्धि ॥ १ ॥ ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि
॥ २ ॥ कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥ ३ ॥
तुका ह्मणे नाना छंदें । या विनोदें न पडावें ॥ ४ ॥

  ५१. काय बो करिसी सोवळे ओवळे । मन नाहीं
निर्मळ वाउगेंचि ॥ १ ॥ काय बा करिसी पुस्तकांची मोट ।
घोकितां हृदयस्फोट हातां नये ॥ २ ॥ काय बा करिसी
टाळ आणि मृदंग । जेथे पांडुरंग रंगला नाहीं ॥ ३ ॥ काय
बा करिसी ज्ञानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं
बोलण्याची ।। ४ ॥ काय बा करिसी दंभ लौकिकातें । हित
नाहीं मात तुका ह्मणे ॥ ५ ॥

  ५२. पापाची वासना नको दावू डोळां । त्याहूनि
अंधळा बराच मी ॥ १ ॥ निंदेचे श्रवण नको माझे कानीं ।
बधिर करोनी ठेवी देवा ॥ २ ॥ अपवित्र वाणी नको
माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥ ३ ॥
नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतून माती उठतां भली
॥ ४ ॥ तुका ह्मणे मज अवघ्याचा कंटाळा । तं एक
गोपाळा आवडसी ॥ ५ ॥

________________________________________

१ चिरा - दगड