पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२


व्हावें । तेव्हांचि निघावे सर्वांतूनि ॥ ३ ॥ तुका ह्मणे जरी
योगाची तांतडी । आशेची बीवुडी करीं आधीं ॥ ४ ॥

  ४५. आशाबद्ध वक्ता । भय श्रोतियाच्या चित्ता ।। १ ॥
गातो तेंही नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें ॥ २ ॥ झाले
लोभाचे मांजर । भीक मागे दारोदार ॥ ३ ॥ उभयता
लोभी मन । वांयां गेलें तें भजन ॥ ४ ॥ बहिरे मुके एके
ठायीं । तैसें झालें तया दोहीं ॥ ५ ॥ माप आणि गोणी ।
तुका ह्मणे रिती दोन्ही ॥ ६ ॥

  ४६. आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास
सर्वजना ॥ १ ॥ आहे ते अधीन आपुले हातीं । आणिकां
ठेविती कायं बोल ॥ २ ॥ जाणतिया पाठीं लागला उपाध ।
नेणता तो सिद्ध *भोजनासी ॥ ३ ॥ तुका ह्मणे भय
बांधलेसे गांठी । चोर लागे पाठी दुम तया ।। ४ ।।

  ४७. जरी आले राज्य मोळविक्या होता । तरी तो
मागुता व्यवसायी ॥ १ ॥ तृष्णेची मजुरे नेणती विसांवा ।
वाढे हांव हांवा काम कामीं ॥२॥ वैभवाची सुखें नातळतां
अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
वाहे मरणाचे भय । रक्षणउपाय करूनि असे ॥ ४ ॥

  ४८. जोडीच्या हव्यासें । लागे धनाचेचि पिसें ॥ १ ॥
मग आणीक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥ २ ॥ पाहे
रुक्याकडे । मग अवघे ओस पडे ॥ ३ ॥ तुका ह्मणे देवा ।
तुला बहुतचि हेवा ॥ ४ ॥


_____

___________________________________________


१. विर्मुलन ( * भजनासी. )