पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११
१५. आशा.


  ४०. कांहीं न मागे कोणासी । तोचि आवडे देवासी
॥ १ ॥ देव तयासी ह्मणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ २ ॥
भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥ ३ ॥ नाहीं
नाहीं त्या समान । तुका ह्मणे मी जमान ॥ ४ ॥

  ४१. आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥ १ ॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ २ ॥ भ्रमलें
चावळे । तैसे उचित न कळे ॥ ३॥ तुका ह्मणे विर्षे ।
अन्न नाशयेलें जैसे ॥ ४ ॥

  ४२. आशा ते करविते बुद्धीचा लोप । संदेह तें
पाप कैसे नव्हे ॥ १ ॥ आपला आपण करावा विचार ।
प्रसन्न ते सार मन ग्वाही ॥ २ ॥ नांवें रूपें अंगीं लाविला
विटाळ । होते त्या निर्मळ शुद्ध बुद्ध ॥ ३ ॥ अंधळ्याने
नये देखण्याची चाली । चालों ऐसी बोली तुका बोले ॥ ४ ॥

  ४३. नसावें ओशाळ । मेग मानती सकळ ॥ १ ॥
जाय तेथे पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ २ ॥ राहों
नेदी बाकी । दान ज्याचे त्यासी टाकी ॥ ३ ॥ होवा वाटे
जना । तुका ह्मणे साटीं गुणां ॥ ४ ॥

  ४४. आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हांचि
गोसावी व्हावें तेणें ॥ १ ॥ नाहीं तरि सुखे असावें संसारीं ।
फजिती दुसरी करू नये ॥ २ ॥ आशा मारुनियां जयवंत

__________________________________________

१ जामीन. २ आपली हौस पूर्ण व्हावी अशी इच्छा करतो.
३ भ्रमिष्ट बडबडते.