पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०. गर्व.

  २४. हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्तशुद्धी सेवा
देवाची हे ॥ १ ॥ आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य
ते येती लाभ घरा ॥ २ ॥ आणिकां अंतरीं न द्यावी वसती ।
करावी हे शांती वासनेची ॥ ३ ॥ तुका ह्मणे बाण हाचि
निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचू नये ॥ ४ ॥

  २५. मायबापें जरी सर्पिण की बोका । त्यांचे संगें
सुखा न पवे बाळ ॥ १ ॥ चंदनाचा शूळ सोनियाची
बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥ २ ॥ तुका ह्मणे
नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥ ३ ॥

  २६. वसोनि थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥ १ ॥
नाहीं देखिला ना ठावा । तोंडपिटी करी हांवा ॥ २ ॥
फुगतें काउळे । ह्मणे मी राजहंसा आगळे ॥ ३॥ गजाहूनि
खर । ह्मणे चांगला मी फार ॥ ४ ॥ मुलाम्याचे नाणे ।
तुका ह्मणे नव्हे सोनें ॥ ५ ॥

  २७. कवण दिस येईल कैसा । न कळे संपत्तीचा
भरंवसा ॥ १ ॥ चौदा चौकाडिया लंकापति । त्याची कोण
जाली गति ॥ २ ॥ लंकेसारिखें भुवन । त्याचे त्यासी पारखें
जाण ॥ ३ ॥ तेहतीस कोटी बांदवडी । राज्य जातां नलगे
घडी ॥ ४ ॥ ऐसे अहंतेने नाडिले । तुका ह्मणे वांयां गेले ॥ ५ ॥

_____
१९. वैर.

  २८. निर्वैर होणें साधनाचे मूळ । येर ते विव्हाळ
सांडीमांडी ॥ १ ॥ नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे

__________________________________________

१ बंदीजन,