पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  २०. विग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया
माय प्रसवली ॥ १ ॥ कठिण हृदय तया चांडाळाचे । जो
नेणें पराचे दुःख कांहीं ॥ २ ॥ आपुला हा प्राण तैसे
सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥ ३ ॥ तुका ह्मणे
सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥ ४ ॥

_______
८.क्षमा.

  २१. दया क्षमा शांति । तेथे देवाचि वसती ॥ १ ॥
पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥२॥ कीर्तनाचे
वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥ ३ ॥ तुका ह्मणे घडे । पूजा
नामें देव जोडे ॥ ४ ॥

  २२. क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति
काय करी ॥ १ ॥ तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । जाय
तो विझोनि आपसया ॥ २ ॥ तुका ह्मणे क्षमा सर्वांचे स्वहित ।
धरा अखंडित सुखरूप ॥ ३ ॥

______
९. शांति.

  २३. शांतीपरतें नाहीं सुख । येर अवधेची दुःख ॥१॥
ह्मणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ २ ॥ खवळलिया
कामक्रोधीं । अंगीं भरती आधिव्याधी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥ ४ ॥

______

__________________________________________

१. भिकारी.