पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



हेंचि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ २ ॥ अवघा
झाला पण । लवण सकळां कारण ॥३॥ तुका ह्मणे पाणी ।
पाताळ ते परी खणी ॥ ४ ॥

  १३. अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे आंतु ।
होय शुद्ध न पवे घातु । पटतंतुप्रमाण ॥ १ ॥ बाह्यरंगाचे
कारण । मिथ्या अवघेचि भाषण¶ । गर्व ताठा हे अज्ञान ।
मरण सवे वाहातसे ।। २ ।। पुरे मातलिया नदी । लव्हाँ
नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं
भंगेना ॥ ३ ॥ हस्ती परदळा जो भंगी । तया पायीं न
मरे मुंगी । कोण जाय संगीं । पाणोवाणी तयेच्या ।। ४ ।।
पिटितां घणे वर सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय
तगती गारा । तया थोरा होऊनि ॥ ५ ॥ लीन दीन हेंचि
सार । भव उतरावया पार । बुडे माथां भार तुका ह्मणे
वाहोनि ॥ ६ ॥

  १४. मुंगी होउनि साखर खावी । निजवस्तूची भेटी
घ्यावी ॥ १ ॥ वाळवंटी साकर पडे । गज येउनि काय रडे
॥ २ ॥ जाला हरिदास गोसावी । अवघी मायिक क्रिया
दावी ॥ ३ ॥ पाठ पाठांतरिक विद्या.। जनरंजवणी संध्या
॥ ४ ॥ प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं
॥ ५ ॥ ब्रह्मज्ञान वाचे बोले । करणी पाहतां न निवती डोळे
॥ ६ ॥ मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती
॥ ७ ॥ तुका ह्मणे धाकुटे व्हावें । निजवस्तूसी मागुन घ्यावें ॥ ८ ॥

________________________________________________

१ जेरीस (* पातळपणे तळा आणि) ( ¶ भूषण ).
२ लव्हाळा ( राहोनी ). ३ नम्र होऊन आत्महित साधावें.
४ ढोंग.