पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 ८. साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें
डोळां न पाहावे ।। १ ।। साधूनी भुजंग धरितील हातीं ।
आणिकें कांपती देखोनियां ॥ २ ॥ असाध्य ते साध्य करितां
सायास । कारण अभ्यास तुका ह्मणे ॥ ३ ॥

 ९. उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥ १ ॥
नये जाऊ पात्रावरी । कवटी सार नारळे ॥ २ ॥ स्त्री पुत्र
बंदीजन । नारायण स्मरवीती ॥ ३ ॥ तुका ह्मणे रत्नसार ।
परि उपकार चिंधीचे ॥ ४ ॥

_____
५.प्रेम.

  १०. प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता
चित्त जाणे ॥ १ ॥ कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा
नाहीं भेटी अंगसंगें ॥ २ ॥ पोटामध्ये कोणे सांगितलें सर्पा ।
उपजत लपा ह्मणऊनि ॥ ३ ॥ बालों नेणें परी जाणे गोड
क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥ ४ ॥ तुका ह्मणे बरें
विचारावे मनीं । आणीक भल्यांनी पुसों नये ॥ ५ ॥

  ११. प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥ १ ॥
बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ २ ॥ वरी
वरी तोंडापुरतें । मोहोरी ते कळतसे ॥ ३ ॥ जाणोनियां
नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥ ४ ॥।

६.नम्रता.

  १२. नम्र जाला भूतां । तेणे कोंडिलें अनंता ॥ १ ॥

_____________________________________________

१. बचनाग - विष.
२. मोहोरी ते कळतसे- जें दर्शनीय ते लवकर तेव्हांच कळते.