पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आख्याने लावून ते कीर्तन करू लागले. पुढे त्यांची कवित्व शक्ति
इतकी वाढली की, ते कीर्तनांत सहज अभंग करून सांगत असत.
त्यांचे बोलणे सुद्धा अभंगमय झाले होते. त्यांची कविता खोल,
हृदयंगम व प्रासादिक आहे. एक दोन ओळी वाचतांच मनांत अर्थ
उतरतो व मनोवृत्ती जागृत होतात. आपण अज्ञान, आपण जें
बोलतों तें ईश्वरी प्रेरणेनेच होय, अशी त्यांची ठाम समजूत होती.
कीर्तनांतील त्यांचे वक्तृत्व इतके अलौकिक असे की, श्रोत्यांवर
त्याचा उत्तम परिणाम व्हावयाचाच. कशाचीही आशा न करितां
दररोज कथा करून ते लोकांना उपदेश करीत असत. त्यांची
कीर्ति लांबवर पसरली. त्याचे कीर्तन ऐकण्यास लांबलांबून लोक
येत असत.

 (छळ) तुकारामाची कीर्ति चोहोकडे पसरलेली पाहून कुत्सित
व मत्सरी लोकांच्या पोटात दुखू लागले. देहूस कोणी मंबाजी
गोसावी रहात असे. त्याचे प्रस्थ अर्थातच कमी झाले. तो
तुकारामाचा द्वेश करू लागला.देवळाच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर त्याने
कांट्या लावल्या होत्या. या यात्रेकरूंना बोचत असत. ही अडचण
दूर करावी ह्मणून तुकारामांनीं त्या उपटून रस्ता साफ केला.
येवढेच निमित्य मंबाजीस पुरे झालें! त्याने तुकारामास त्याच
काट्यांखाली खूप झाडपले. तुकोबाने अभंग ह्मणून हे गाऱ्हाणे
देवाला कळविले व मंबाजीला फार श्रम ह्माले ह्मणून उलट त्याने
त्याचे हात पाय चेपले! तुकारामबुवा शूद्र असून कीर्तनांत
वेद, गीता, उपनिषदें यांतील रहस्य सर्वांना समजावून सांगतो.
ब्राह्मण त्याच्या पायां पडतात. या अधर्माबद्दल रामेश्वरभट्टाने
दिवाणांत फिर्याद केली. तुकारामास हद्दपार करावे असा
हुकूम सुटला. हे कृत्य रामेश्वरभट्टाचे आहे, असे समजतांच
ते वाघोलीस त्याच्या भेटीस गेले. त्यांनी तेथे कीर्तन केले.
श्रुतिप्रमाण वचने त्यांच्या तोंडून ऐकून रामेश्वरभट्ट संतापून
बोलले, ' तू शुद्र हीं श्रुतिवचनें बोलून आपणास आणि श्रोत्यांस