पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 (पूर्वतयारी) याप्रमाणे चोहोंकडून मारा चालू असतांना
तुकोबाची मनोवृत्ति बालरवींप्रमाणे आपलें तेज प्रकाशित करुं
लागला. या काळोखमय मेघराशीतून चिरंतन प्रकाशणारे रविबिंब
बाहेर पडून त्याचा प्रकाश भूमंडळावर पडावयाचा होता. आपलें
जीवित कर्तव्य करण्याचा तुकारामाचा निश्चय ठरला होता.
संसारांत निमग्न होऊन कर्तव्य विसरणारा तो नव्हता.
लोकप्रवादास भीक घालून त्यांच्या छंदाप्रमाणे वागण्याइतका तो
मूर्ख राहिला नव्हता. त्याच्या भावी उन्नतीची तयारी या
विपरीत स्थितींत चालू होती. एके दिवशी बायकोच्या त्रासास कंटाळून
देहूपासून दोन कोसांवर भाबनाथ नामक डोंगर आहे तेथे जाऊन
तो एकांतांत इश्वरचिंतन करीत वसला. इकडे घरच्या मंडळाने शोध
चालविला. चार दिवसांनी कान्होबाची व त्याची भेट झाली.
त्यांनी संसार करण्याचे साफ नाकारले. कान्होबास अर्धी खतपत्रे
देऊन आपल्या वाट्याची अर्धी त्यांनी इंद्रायणींत बुडवून टाकली.

 (ईश्वरीसंदेश) त्यांना ज्ञानदेव नामदेव एकनाथ, कबीर ह्यांचे
कांहीं अभंग, पदें, दोहोरे वगैरे पाठ येत होतीच. शिवाय त्यांनी
अनेक ग्रंथ वाचून पाठांतर चालविले. पौराणिक ग्रंथांची माहिती
करून घेतली. हरदासाच्या मागे उभे राहून ध्रुपद धरावें व कीर्तनाचा
अभ्यास चालवावा. देहू जवळ भंडारा नामक जो डोंगर आहे, तेथे
जाऊन एकान्तांत त्यांनीं ग्रंथ पठण व मनन करावे. ह्याप्रमाणे
अभ्यास चालू असतांना त्यांना नामदेवाचे राहिलेले अभंग पूर्ण
करण्याविषयीं दृष्टांत झाला. एक दिवस पहाटेस त्यांना स्वप्न पडले
की, आपण गंगा स्नानास जात असतांना कोणी केशवचैतन्य
राघवचैतन्य या सत्वशील ब्राह्मणास आपण नमस्कार केल्यावर त्यांनी
रामकृष्णहरि हा गुरुमंत्र दिला. भोजनास पावशेर तूप मागितले.
परंतु जिजाबाईने दुरुत्तरें केल्यामुळे ब्राह्मण विन्मुख परत गेला.
हाच त्यांचा गुरूपदेश.

 (कविता) प्रथम त्यांनी बाळक्रीडेचे अभंग केले. गौळणी,
काला, खेळांवरील रूपकें, चरित्रात्मक अभंग ही केली. पोराणिक