पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९६

 २७३ ॥ ९ ॥ पूर्व--आदि--ब्रह्म स्थितीची अनओळख ह्मणजे
ओळखीचा आभाव हेच मरण. त्या मरणापासून जगविणारे नामामृत
होय ( २ ) नामामृत जीवन जरी पावे तरी मरण जे तेच पूर्वानुओळख.
पूर्वीची ओळख.

 २७६ ॥ १ ॥ तुझे श्रीमुख पाहतां सुख सुख पावले.

 २७७ ॥ सागराचे दर्शण झाले की ओहोळ सागरच होतो.

 २८८ ॥ १॥ जे ज्ञानी आहेत त्यांच्या घरी देवाचा शोध
केला असतां तेथें अहंभाव पाठ पुरवितो.

 २९१ ॥ १।। अंधळ्याचे श्रम शिकविल्यावांचून व्यर्थ,
जो जो त्याला शिकवितो त्याचेच नांव होते.

 २९८ ॥ ४ ॥ पायांना चलन आहे ते पुष्कळ ठिकाणी
फिरवितात. तरी तुझ्या चिंतनाचा आळस घडू नये.

 २९९ ॥ ५ ।। आह्मी दुर्बळ चुकलेलो आहों असे वाटते.

 ३१० ॥ ३ ॥ बहुतांची बहुत प्रकारची सोंगे केली.
बहुत काकुळती येऊनियां तुका निकट वृत्ति झाला, त्याने जवळ
येण्याचा प्रयत्न चालविला.

 ३२० ॥ २ ॥ ह्या भाग्याने जिंकलेला असे. ह्या
भाग्याचा मला सदा लाभ असो.

 ३३५ ॥ ४ ॥ नर नारी किंवा कोणी कोणत्याही
जातींचे असे त्यांना नारायणाचा एकविध प्रेमानें धांवा करावा.

 ३५० ॥ १ ॥ मर्मज्ञ लोकच हे घेतात. याची कदर
त्यांनाच आहे. हे टांकसाळींतून विपुल भराभर निघणारे नाणे नव्हे.

 ३५२ ॥ २ ॥ आह्मांला त्या रोग्यांची अशी कोणती
सलगी, किंवा भीड आहे की भलत्यांला भलते औषध देऊन
त्यांची विटंबना करावी किंवा कुपथ्य होईल असे करावें,
रोग्यांच्या कला प्रमाणे बोलण्याची आह्मांला काय गरज ?

______