पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५ 


 २१९ ॥ ४ ॥ ज्यांचे निजधन नारायण ते आमचे सोयरे,

 २२० ।। ३ ॥ जे सांगडीचा ताफा दुखवी तो बुडे.
॥ ४ ॥ जेव्हां दैव फिरते तेव्हां वाईट गोष्टी घडून येतात.

 २२१ ॥ ४ ॥ भजन करू किंवा नको, हा मजला
दोन्हीकडून संशय उत्पन्न झाला आहे. कारण भजन करू लागलो
तर पंडित छळतील, बरे न करावें तर मी बुडतों.

 २२३ ॥ २ ॥ भिन्न भावना मुंडाव्या-नाहींशा कराव्या.

 २२४ ॥ ३ ॥ धांवा-बळद--बळदांत आणि पेंवांत
शिरल्याने या ठिकाणी सिद्धि प्राप्त होतील काय ? ।। ५ ।। वर्णाश्रमाचे
धर्म पाळतांना संकट वाटले तर ते व्यर्थ होतात.
॥ ६ ॥ सोंग हा एक पाशच आहे.

 २२६ ॥ २ ॥ आकाशाची वास–वाट पाहे ।। ४ ॥ तुझ्या

चरण कमलांच्या योगाने सर्व फळे मिळतात. 

 २२८ ॥ २ ॥ सुख वच बीजाचे ठायींच दुखवितो.

 २३१ ॥ ४ ॥ मनाचे आवेग सहन कर. तुका ह्मणे
हे वर्म थोडें आहे.

 २३३ ॥ ४ ॥ आपणांस वाटते ते वेडे. परंतु ते आहे.
तसेच आहे, वेडें नाहीं.. वादं–वितंड वादाने.

 २३४ ॥२॥ हत्तीचे पोषण करण्याचा भार मुंगीवर घातला
तर ती गोष्ट घडून येईल काय ? पारध्याजवळ फांसे, जाळीं व
कुऱ्हाडी ही असतात परंतु प्रसंग पाहून तो ती उपयोगांत आणतो

 २४२ ॥ ३ ॥ श्रेष्ठ व कनिष्ट वर्णाच्या लोकांकरितां
भूमि वेगळाली केली आहे काय ?.

 २४७॥ १ ॥ जेथे चित्त साक्षी आहे तेथे लौकिकाची
कार्य तमा. आपल्याच ठिकाणी आपले स्वहित आहे.
॥ ३ ॥ शुद्ध भावाला पाल्हाळ किंवा खुलासा नको. जें खरे
ते दुसऱ्या ठिकाणी तेव्हांच उमटते. भाट--स्तुतिपाठक,

 २५६ ॥ ४ ॥ ज्याच्या नावाने मान्यता पावले ते भले.