पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९४

 १८४ ॥ ३ ॥ जो भक्ष अमंगळ तो ती खाय खाते.

 १८६ ॥ ३ ॥ ह्या चरणाचा अर्थ बरोबर लागत नाही.

 १८७ ॥ ३ ॥ तुका ह्मणे जो धन्य पुरुष देव दाखवील
त्याची भेट होणें महत् पुण्य होय. कारण तो कल्पतरु किंवा
कामधेनू प्रमाणे अलौकिक असणार.

{{gap}१८९ ॥ ३ ॥ पाल्यास जतन केले असतांना (प्रांती)
शेवटी धान्य, फळे येतात.

 १९० ॥ ५ ॥ मोहाच्या ओघाने मन चालत असते.
ओहोळ गंगेला मिळतात ह्मणून गंगा परतेल काय ?

 १९१ ॥ ३ ॥ स्वादी-पारखी. तुका ह्मणे जो खोटा तो
खात्रीने नागवलाच आणि शेवटीं तो अपमान पावणारच.

 १९८ ।। ४ ।। आमचा उपदेश ऐकिला असतां बरें
घडेल. हा चांगला माल भरला की, तो देशोदेशीं सर्व ठिकाणी
कौतुकानें चालेल.

 २०५ ॥ २ ॥ लोलुपता काय-काय उपयोगाची.

 २१० ॥ ५ ॥ करुणा भाकणे हे माझे काम ते
मी करीन. ज्याची जशी वासना तसे त्याला फळ.

 २१३ ।। १ ।। वेषाला बोल नाहीं, अवगुणांला दोष.
दुसरा वीराचे अलंकार घालतो, त्यांचे भार वहातो; परंतु त्याला
शूराचा मान मिळेल काय ?

 २१४ ॥ ४ ॥ शांतीचे बळ क्षमा ती अंगी असलीं
ह्मणजे अंतर शीतळ रहाते.

 २१५ ।। २ ।। व्यभिचार-कर्तव्यांतर, कर्तव्य टाकून
इतर काम करणे ।। ३ ।। हेच खरोखर अभाग्य, विश्वास मूळ
आणी-- विश्वासाला बोलावणे पाठवून तो आण,

 २१८ ।। २ ।। महाबुद्धीचा लाभ जोडो. महात्मेपणाचा
लाभ घडो. ॥ ३ ।। ( दुसरा अर्थ ) अंतर्यामी जी ईश्वरी ज्योत
आहे ती सत्यसंकल्पा (साठीं) करितां, शुद्ध हेतू करितां-उजळा.
तुका ह्मणे मनी कांहीं वाऊगे न ठेवतां शुद्ध भाव राखावा.