पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९३

 १४८ ॥ १ ॥ विटाळसे-अस्पृश्य, अमंगळ, वस्तूप्रमाणें
॥ ४॥ त्याच्या ठायीं तें पाप मोठ्या आदराने राहाते.

 १४९ ॥ ४ ॥ तुका ह्मणे सर्प नवनीत पाजून काय उपयोग,
अमृताचे विष निश्चित होते.

 १५० ॥ ४ ॥ वेळू चंदनाच्या संगतीत व जवळ असूनही
त्यांना सुवास लागत नाहीं.

 १५१ ॥ ३ ॥ भावार्थ वचन-ख-या अर्थाचे भाषण.

 १५४ ॥ १ ॥ कुदळ घेऊन मारण्यास धांवतो.

 १६३ ॥ १ ॥ लौकिकाचारांत तो उत्तम दिसतो.

 १६७ ॥ ५ ॥ जो शिष्य गुरुला भजणार नाहीं तो
आपलें अनहित करून घेईल.

 १७२ ॥ २ ॥ आपुलें हित काय आहे हे त्याला
समजत नाहीं, 'पोपट नळीवर बसून ती पायांनीं घट्ट धरुतो
आणि आपणास कोणीं बांधले आहे अशी त्याची कल्पना होते.
त्याला आपल्या पंखांची विस्मृति पडते.

 १७४ ॥ ३ ॥ हर्षाहर्षी मंगा न ये-आनंद झाला
असता किंवा राग आला असतांही समवृत्ति सोडू नको. तुका
ह्मणे जीवाने अगोदर मरून रहावे. ह्मणजे मरणाचे भय नाहीं.
जीवाच्या सर्व भावना अगोदर नाहीशा कराव्या.

 १७५ ॥ ४ ॥ मोती शिप पोटीं मात्र उत्पन्न होते.
परंतु तिला brया1त्याचा भोगही नाही आणि भेटही नाहीं.

 १७६ ॥ ४ ॥ जोपर्यंत तो यमदुतांच्या हाती पडला
नाहीं, स्वाधीन झाला नाही, तोपर्यंत ममता वाढवितो.
तुका मात्र उपदेश करतो. परंतु हेकड माकड कांहीं ऐकत नाहींत.

 १८० ॥ ३ ॥ सोंवळ्याचा मात्र डौल, परंतु अंतर्यामी
क्रोधाने विटाळलेला असतो. तुका ह्मणे ते सोंग बाहेरील रंग दाखविते.

 १८२ ॥ ४ ।। तुका ह्मणे व्यर्थ चित्त कां दुःखपाववावे.

 १८३ ॥ २ ॥ लाभ हानी ज्याची त्याला. त्याला पावसाने
काय करावे ? भुमीने काय करावे ? त्यांची स्वाभाविक क्रिया चालू असते.