पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९२

भाग्ये सन्मुख होतात. ॥ ४ ॥ तुका ह्मणें भीति किंवा काळजी
कशाची त्या ठिकाणीं सुजाती आहे. किंवा-जेथे सुजाती आहे ते
ठाकणी - त्या जागेला भीति कशाची.

  ९४ ॥ ३ ॥ कुत्र्याला खीर घातली असता ती त्याला
ओकविते. परंतु भोक्ता जो असतो तो ती पोटभर खातो.
ती त्याला पुष्टी देते.

  ९६ ॥ ४ ॥ नरजन्म हे भांडवल. ॥ ५ ॥ मी वायां
गेलो आहे असे दिसते, आणि मो जो हा लौकिक वाढविला आहे
याचे हांसू होईल.

  ९७ ॥ ४ ॥ लग्नकार्यात पुष्कळ पैसे खर्च केले,
उत्तम तयारी केली परंतु नवरा नवरीस ठिकाण नाही तर
त्याचा काय उपयोग ? सर्व फुकट.

  १०० ॥ २ ॥ सोपारे-सोपे.

!  १०४ ॥ ३ ॥ दयेकरितां हा सर्व पसारा, ही खटपट,
जड जीवांना तारण्याकरितांच या कथारूपी नावा, तरी केल्या,
तारा-तरी, उताराच्या जागा

  १०५ ॥ ५ ॥ सूर्याप्रमाणे तुका हा सर्व ठिकाणी आहे.
याचे अंतःकरण विश्वमय झाले आहे.

  १०६ ॥ १ ॥ चंदनाच्या झाडाचे सर्वच भाग
चंदनयुक्त सुवासिक.

  ११५ ॥॥ तुका गाण्यांत तन्मय होतो.

  ११४ ॥ ३ ॥ जो चतुर तो लक्षणांनीं, खुणांनी ओळखून
राखतो. ॥ ४ ॥ सर्वश्रम एके ठिकाणी. एक दिवा हाती असला
की त्याला सर्वच बरें.

  १३१ ॥ ४ ॥ तुका ह्मणे त्यांची जातच अशी की ते
नरकाकडेस पायांनी चालत जातात

  १०४ ॥ १॥ जे धोब्यापेक्षा सर्व गुणांनी अधिक परंतु
भला. सरते-मार्गाला लागणारे, चालतील असे.