पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९१

  ५८ ब्रह्मचाऱ्याने विद्यार्जन करावे, गृहस्थाश्रमी मनुष्यानें
शट्कर्मविहित आचरण करावे. वानप्रस्थाश्रमी यांने संसारांत
राहून कर्मफलाचा त्याग करावा आणि संन्याशाने सर्व संकल्पांचा,
परित्याग करावा. जो ह्या विरहित वागतो तो वेदाज्ञेप्रमाणे पतित
होतो. तुका ह्मणे नेमावांचून कार्यसिद्धि नाहीं, ज्याला नेम नाहीं
तो शीण पावतो, दुःख पावतो.

  ६० ॥ २ ॥ वासनेच्या द्वारें काम वाढे, भय वाढे. योग्य
काळाने ते सर्व धुळीस मिळविलें, ॥ ४ ॥ लटिक्याची स्तुति होता
जिव्हेसी मळ विटाळ करी.

  ६२ ॥ ४ ॥ वर्म न समजता जो खटपट करतो. ती त्याची
बुद्धि त्याला अवकळा पाठविते.

  ७० ॥ ४ ॥ वाऱ्याने काळवेळ, अनुमान, थंडी, वारा,
इत्यादि समजतात.

  ७४ ।। ४ ।। हा अग्नि आहे, ह्यांत पाय घालू नये, तो
आपणास जाळील हा विचार सती जसा पहात नाही, तद्वत् साधकाने
इतर विचार सोडून देऊन मन घट्ट करावे.

  ७७ ॥ ३ ॥ अवघे साधन, अवघे साध्य हे की तुझ्या
पायांवर माझा सर्व जीवभाव असावा.

  ८० ॥ ५ ॥ या अनुभवाने समजले जाते.

  ८७ ॥ ४ ॥ जिवंत आहां तोंपर्यंत जीवाला निश्चित ठिकाणी
लावा, गुंत्यांत पडलो असतांना देशोधडीस लागाल, वाहावाल.

  ८८ ॥ ४ ॥ आधी तुका नागवला. तो मनुष्य कोटींतून
पलीकडे गेला.

  ९१ ॥ १ ॥ वनस्पतींना बोलावून ॥ ३ ॥ बाबांनो जागे
व्हा असें ह्मणून सूर्य लोकांना जागे करीत नाही. लोक आपोआप
जागे होतात. किरणांनों प्रकाश करा असेही तो ह्मणत नाहीं,
तो स्वतः प्रकाशमान असतो.

  ९३ ॥ २ ॥ धन्य जाती असली तर भाग्यें वेधली
जाऊन सन्मुख होतात. किंवा पूर्व संचितार्ने धन्य जाती साध्य केल्यावर