पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९०

 १७ ॥ २ ॥ नीति, अनीति ह्यांचा विचार न करतां जें करणें
ते पाप, उन्मत्त नेहमीं असेंच भलते करीत असतात. सार आणि
असार निवडणे, वेगळाली करणे हाच धर्म, हीच नीति.

 १९ ॥ ३ ॥ हे आपल्या कर्माची फळे भोगतील हे मी आपल्या
डोळ्यांदेखत पाहीन.

 २१ ॥ २ ।। तो धावून त्या घरास येतो आणि तेथे थारा धरून
राहतो ॥ ४ ॥ तुका ह्मणे नामें पूजा घडे, नामें देव जोडे.

 २३ ॥ ३ ॥ ४ ॥ काम क्रोधाने खवळल्यावर लोभ, मोह, दंभ
इत्यादि प्रकारच्या अनेक व्याधी अंगीं भरतात, परंतु त्यांचा त्याग
करून शांति धरली की सर्व व्याधी आपोआप जातात.

 ३० ॥ ३ ॥ आपलीच रूढी तिने प्रचारात आणली, परंतु पोटी
ती वाईट आहे, हे लोकांना समजत नाहीं. राउळा-आमच्या
कीर्तन समारंभांत. देवळांत.

 ३१ ॥ ४ ॥ माहेर-आवडीचे स्थळ-ईश्वर चिंतन.-सुखासाठी
तिला खांद्यावर वाहिले असतांना तिने अवगुणांचा समुदाय
मिळविला. केला चौघाचार इ० पंचाईत केली. लोकांमध्ये खेचून
नेलें. अध्यात्मिक अर्थ-मला पंचेंद्रियांच्या स्वाधीन केले.

 ३६ ॥ ४ ॥ ह्या देहाची पाठवणी-बोळवण करून स्वर्ग
साध्य करू.

 ३९ ॥ २ ॥ बाजारांत त्याचा मोठा दगा झाला. चोर त्याच्या
गांठीचे भांडवल घेऊन गेले. भांडवल जाऊन ही तो मोकळा नाहीं.
दंभ लोभ यांनी त्याचा गळा बांधला. ॥ ४ ॥ त्याच्या गांठीस
नागवण पडली असे दिसे.

 ४५ आशाबद्ध वक्ता व श्रोता ह्यांची गांठ ह्मणजे बहिऱ्या मुक्याची
गांठ, अशा भजनाचा लाभ कोणता. तुका ह्मणे ते मापही रिकामे
आणि ती गोणीही रिकामीच.

 ४६ ॥ १ ॥ उदास–निस्पृह, जो नेणता त्याचे मागें उपाधी
नाहीं. तो भजनास किंवा मोजना तयार.

 ४८ ४ ॥ देवा तुला हव्यास फार आहे. धनलोभ्यासारखी
तुझी तऱ्हा आहे.