पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८९

  कांहीं कठिण अभंगांचे विशेष स्पष्टीकरण.

 २ ॥ १ ॥ पुढे रोग होऊ नये, पुढील बाधा निवारण व्हाव्या
ह्मणून आई मुलाला औषध देते. परंतु त्याला त्यापासून दुःख
वाटते.

 ३ ॥ १ ॥ [ दुसरा पाठ.]. बाळ निरवावे-आईजवळ बाळ
सोपवावं लागत नाहीं. ॥ २ ॥ ज्याने जन्म दिला त्याला काळजी;
असे असतांना मी कां विचारांत पडलो. आघात-मार,

 ४ ॥ १ ॥ लळा लावून ती मुलाचे पालन करीत नाहीं काय ?
कांटाळा-कंटाळा.

 ९ ॥ ३ ॥ स्त्री, पुत्र व सेवक ह्यांच्या नांवांनी देवाचे स्मरण
होते. अजामीळ देवाचे नांव घेत नसे. परंतु मुलाचे नांव घेतल्याने
त्याने देवास हाक मारली. ( ४ ) चिंधींत बांधलेले रत्नच घ्यावयाचे
असते. परंतु चिंधी ते सांभाळून ठेवते. ह्मणून तिचे उपकार.

 १० ॥ ४ ॥ बालकाला बोलता येत नाहीं तरी गोड, तिखट,
खारट ह्यांची चव कळते. वरे काय, वाईट काय ह्याचा मनांतच विचार
करावा. भल्यांनी अधिक विचारण्याचे कारण नाहीं.

 ११ ॥ ४ ॥ तुका जाणोनियां नेणता, लोकांसारिखा नव्हे.
लोकांना तोंडापुरते कोणते, खरें जिव्हाळ्याचे कोणते, हे समजत
नाहीं. कित्येक समजतात व मोहांत पडतात. तसा तुका नव्हे.
तो हे जाणूनही अज्ञान बालक आहे. त्याचा भार त्याच्या आईवर
पांडुरंगावर आहे.

 १२ ॥ ३ ॥ अंगीं नम्रता असली की सर्व पण-हेतू साध्य
होतात. ॥ ४ ॥ तुका ह्मणे पाणी पातळ, त्यांत ताठपणा नाहीं, तरी
सुद्धां ते तळास, भुईस खणीत जाते.

 १३ ॥ १ ॥ तंतु ज्या प्रमाणे वस्त्रांत मिळून जातात, नाश
पावत नाहीत. ॥ ४ ॥ हत्ती सैन्याची दाणादाण करतो परंतु लहान
मुंगी त्याच्या पायाखाली मरत नाही. तिच्याबरोवर हत्तीच्या पायाखाली
कोण जाऊ शकेल ? कारण ती लहान व नम्र आहे.