पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८८


८० तुका ह्मणे भलते याती। विठ्ठल चित्तीं ते शुद्ध.
८१ आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां ते मग गोवी नाही.
८२ अह्मां हें कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते.
८३ नाहीं शीण आह्मां जालें कवतुक । पुनीत हे लोक करावया.

परमेश्वराविषयीं.

८४ तुका ह्मणे सकळ तीर्थे । तुझे पायीं वसती तेथे.
८५ सत्य संकल्पावादाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ.
८६ तुका ह्मणे सीमा नाहीं तुझे दये। कोमलहृदये पांडुरंगा.
८७ जे जे शरण आले ते ते आपंगोले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे.
८८ तुका ह्मणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूंचि पाहीं शत्रू सखा.
८९. तुका ह्मणे उदक तारिले दगड । तैसा मीही जड एक देवा.
९० अवघाचि आकार ग्रासियेला काळे । एकचि निराळे हरीचे नाम.
९१ बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । यी अविश्वासी सर्वभावें.
९२ तुका ह्मणे भार घातलीयावरी । होईल कैवारी नारायण,

समाप्त.