पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८७


५३ तुका ह्मणे बळे । उपदेशाचे तोंड काळे,
५४ बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावे,
५५ तुका ह्मणे अझुनि तरी । उरलें तें जतन करी.
५६ तुका ह्मणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊ नका,
५७ कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे,
५८ खोल ओले पडे ते पीक उत्तम । उथळाचा श्रम वायां जाय,
५९ उंबरांतील कीटका । हेंचि ब्रह्मांड ऐसे लेखा.
६० आंधळयाचे काठी लागले आंधळ। घात एक वेळ मागे पुढे.
६१ बीज पेरूनियां तेंचि ध्यावे फळ । डोरलीस केळ कैसे लागे.
६२ चिंतनासी नलगे वेळ । सर्वकाळ करावे.
६३ प्रीतीचिया बोला नाहीं पेसपाड । भलतेसे गोड करून घेई.
६४ तुका ह्मणे सांडी लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल.
६५ शूरत्वावांचूनी शूरांमाजीं ठाव । नाहीं आविर्भाव आणिलिया.
६६ लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्यायनीत.
६७ शिकवूनि हीत । सोयी लावावे हे नीत,
६८ अंतरीचे ध्यान । मुख्य या नांवें पूजन.
६९ वेळो वेळां वाचे आठवितां नाम । अधिकचि प्रेम बाढे घेतां,
७० पेणावलें ढोर मार खाय पाठीं । बैसलें तें नुठी तेथूनियां.
७१ स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा..
७२ चंदनाच्या वासे वसतां चंदन । होती काष्ट आन वृक्षयाती.
७३ तुका ह्मणे आधी करावा विचार । शूरपणे तीर मोकलावा.
७४ कोठे नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते.
७५ घूसळितां ताक कांडितां भूस ! साध्य नाहीं क्लेश जाती वांयां.
७६ तुका ह्मणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें.
७७ रडोनियां मान । कोण मागतां भूषण.
७८ आणितां त्या गती । हँस काउळे न होती.
७९ बेडकाने चिखल खावा । काय ठावा सागर.