पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८६
आळस.

३५ काय करू मज नागविले आळसें । बहुत या सोसे पीडा केली.
३६ तुका ह्मणे आळस । तोचि कारणांचा नास.

शंका.

३७ संदेह निरसे तर रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं.
३८ तुका ह्मणे शंका । हित आड या लौकिका.

मन

३९ आपुलेंचि मन । करवी आपणां बंधन.
४० अवघ्या उपचार । एक मनचि दातारा.
४१ शास्त्रज्ञ हो ज्ञाते असती बहुत । परि नाहीं चित्त हाता आलें.
४३ तुका ह्मणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा.

चित्तशुद्धि.

४३ चित्त ते निर्मळ जैसे नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी.
४४ उभयतां एक चित्त । तरी प्रीत वाढली.
४५ तुका ह्मणे बुद्धि । ज्याची तेच तया सिद्धि.


शरीर.

४६ शरीर सोकले देखलिया सुखा । कदान्न हे मुखा मान्य नाहीं.
४७ तुका ह्मणे जाला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा आळस बहु
४८ तुका ह्मणे पोटें केली विटंबना । दीन झाला जना कींव भाकी.


मद्यपान,

४९ तुका ह्मणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची.
५० मद्यपी तो पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांयां.


उपदेशपर.

५१ तुका ह्मणे कानी । घालं, आले दुष्टवाणी
५२ तुका ह्मणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक.