पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८५

१५ अभिमानाची स्वामिनी शांति । महत्व घेती सकळ.
१६ तुका ह्मणे क्षमा सुखाची हे राशी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावे.

धैर्य.

१७ तुका ह्मणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची.
१८ धीर तो कारण । साह्य होतो नारायण.
१९ शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल.
२० तुका ह्मणे नाहीं ज्यासी निर्धार । नाडला साचार तोच एक.
२१ हा गे आलों कोणी ह्मणे बुडतिया। तेणे किती तया बळ चढे.

शब्द आणि क्रिया.

२२ बोलाविच कढी बोलाचाचि भात । जेवूनियां तृप्त कोण झाला.
२३ तुका ह्मणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं.
२४ बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल.
२५ तुका ह्मणे जे जैसे करिती । ते पावती तैसींच फळे.

वर्म.

२६ तुका ह्मणे वर्म । येरा नाचवितो भ्रम.
२७ वर्म जाणावे हा मुख्य धर्म सार। अवघे प्रकार तयापाशीं.
२८ कर्म चुकालिया नव्हे ते कारण । केला होय शीण आवघाचि

गर्व.

२९ मान दंभासाठीं । केली अक्षरांची आटी.
३० पंडित ह्मणतां थोर सुख । परि तो पाहतां अवघा मुर्ख.
३१ विद्या अल्प परी गर्व शिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोण आहे.

लाज

३२ लाज पुढे उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात.
३३ जरी हे आड येती लाज । कैसे काज साधते.
३४ उल्लंघली लाज । तेणें साधियेलें काज,