पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८४

सेविलियां हित फार होय ॥ २ ॥ तुका ह्मणे देवा केला
बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥ ३ ॥

  ३९१. नव्हों वैद्य आह्मी अर्थाचे भुकेले । भलते द्यावे
पाले भलत्यासी ॥ १ ॥ कुपथ्य करूनि विटंबावे रोगी ।
काय हे सलगी भीड त्याची ॥ २ ॥ तुका ह्मणे लासू फांसू
देऊ डाव । सुखाचा उपाव पुढे आहे ॥ ३ ॥

_____
तुकारामाच्या अभंगांतील निवडक वेंचे
थोरपण

१ संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्वचि बरे वहु वाटे.
२ जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये.
३ तुका ह्मणे थोरपणे । नरक होती अभिमानें.

संगति

४ तुका ह्मणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगो.
५ तुका ह्मणे करूं ऐसीयाचा संग । जेणे नव्हे भंग चिंतनाचा.

दया

६ धन्य ते संवसारीं । दयावंत जे अंतरीं.
७ परउपकारें कायावाचामन । वेचे सुदर्शन रक्षी तया.
८ जीवा ऐसे देखे आणिकां जिवांसी। निखळाच राशी गुणांचीच.
९ नारायण भूतीं न कळे जयासी । तयां गर्भवासी येणे जाणे.
१० आत्मा नारायण सर्वं घटीं आहे । पशुमध्ये काय कळों नये.
११ देव सारावे परते । संत पूजावे आरते.
१२ भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना ने देखवे.

क्षमा-शांति

१३ सुख देते शांती । तुका ह्मणे धरितां चित्तीं.
१४ योग्याची संपदा त्याग आणि शांति। उभय लोकीं कीर्ति सोहळा मान.