पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८३

नारायणे कृपा कीजे ॥ २ ॥ नावडावे रूप नावडावे रस ।
अवघी राहो आस पायांपाशीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे आतां
आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥ ४ ॥

  ३४७. ऐसे भाग्य कई लाहाता होईन । अवघे देखें जन
ब्रह्मरूप ॥ १ ॥ मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें
सागर हेलावती ॥ २ ॥ शांति क्षमा दया मूर्तिमंतः अंगीं ।
परावृत्त संग कामादिकां ॥ ३ ॥ विवेकासहित वैराग्याचे
बळ । धगधगतो ज्वाळ अग्नि जैसा ॥ ४ ॥ भक्तिनवविधा
भावशुद्ध बरी । अलंकारावरी मुगुटमणि ॥ ५ ॥ तुका ह्मणे
माझी पुरवीं वासना । कोण नारायणा तुजविण ॥ ६ ॥

  ३४८. काय माझे नेती वाईट ह्मणोन । करू समाधान
कशासाठीं ॥ १ ॥ काय मज लोक नेती परलोका । जातां
कोणा एका निवारेला ॥ २ ॥ न ह्मणे कोणासी उत्तम
वाईट । सुखें माझी कूट खावो मागें ॥ ३ ॥ सर्व माझा
भार असे पांडुरंगा । काय माझे जगासवें काज ॥ ४ ॥ तुका
ह्मणे माझे सर्वहीं साधन । नामसंकीर्तन विठोबाचें ॥ ५ ॥

  ३४९. आपुलिया बळे नाहीं मी बोलत । सखा कृपावंत
वाचा त्याची ॥ १ ॥ साळुकी मंजूळ बोलतसे वाणी ।
शिकविता धणी वेगळाची ॥ २ ॥ काय म्यां पामरें बोलावी
उत्तरें । परी त्या विश्वभरें बोलविलें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगळां पायांविण ॥ ४ ॥

  ३५०. नव्हे हे कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले
जन भले लोके ॥ १ ॥ लागलासे झरा पूर्ण नवनीतें ।

__________________________________________

१ निंदा करोत. २ जे भले आहेत परिक्षक आहेत तेच 

हे घेतात. ३ नवनीताने भरलेला.