पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८२

  ३४२. वेळोवेळां हेंचि सांगें । दान मागें जगासी
॥ १ ॥ विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊ धणी पंगती ॥ २ ॥
वेचतसे पळे पळ । केलें बळ पाहिजे ॥ ३॥ तुका ह्मणे
दुश्चित नका | राहों फुका नाडे हा ॥ ४ ॥

  ३४३. हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा.
॥ १ ॥ गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥ २ ॥
नलगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ॥ ३ ॥
तुका ह्मणे गर्भवासी । सुखे घालावे आह्मांसी ॥ ४ ॥

  ३४४. कळेल हे तैसे गाईन मी तुज । जनासवें काज
काय माझे ॥ १ ॥ करीन मी स्तुती आपुले आवडी ।
जैसा माझ्या गोडी वाटे जीवा ॥ २ ॥ होऊनि निर्भर
नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदेकरूनियां ॥ ३॥ काय करू
कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकळिका ॥ ४ ॥
तुका ह्मणे माझे जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥ ५ ॥

  ३४५. पोटी शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी
सुखाची कोण तया ॥ १ ॥ तैसे मज कां गा केले
पंढरिराया। लौकिक हा वांयां वाढविला ॥ २ ॥ज्वरलियापुढे
वाढिलीं मिष्टानें । काय चवी तेणे घ्यावी त्यांची ॥ ३ ॥
तुका ह्मणे मढे शंगारिलें वरी । तेचि झाली परी मज देवा ॥ ४ ॥

  ३४६. नावडावें जन नाबडावा मान । करूनि प्रमाण
तूंचि होई ॥ १ ॥ सोडवूनि देहसंबंध व्यसने । ऐशी

___________________________________________

१ आपण सर्व पोटभर विठ्ठल हे मंगल नाम घेऊ या.
२ तुका ह्मणे निराश गाफल राहूं नका. तो व्यर्थ दगा आहे.
३ संपत्तीचे वैभव,