पान:तुकारामबोवा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

तल्लीन होऊन जाणारा, निसर्गरूपांत बिंबलेल्या ईशविभूतीला, सर्व मनोवृत्ति अर्पण करणारा, व सात्विक भक्तिभावानें अंत- रंगांत थबथबून गेलेला, आंग्ल कवी वर्डस्वर्थ, यानें एके ठिकाणी आपल्या मित्राला सांगितलें कीं, "मित्रा, तें सृष्टि- सौंदर्य-तें सृष्टीचें दिव्य प्रेमळ स्वरूप - अवलोकन करून माझें अंतःकरण सात्विकभक्तीनें अगदी तुडुंब भरून गेलें, त्या वेळीं सृष्टिसेवा करण्याची मीं कांहीं प्रतिज्ञा केली नाहीं; परंतु सृष्टिदेवनिंच प्रतिज्ञा करून मला असा बांधून घेतला कीं, तेव्हांपासून मी आपोआपच तिचा अनन्य भक्त होऊन, तिचे गुणानुवाद माझ्या मुखांतून निवूं लागले !" सृष्टिस्व- रूपी दिव्यविभूतीचा जो परिणाम वर्डस्वर्थत्रर झाला, तोच परिणाम पांडुरंगस्वरूपी दिव्य विभूतीनें तुकारामत्रोत्रांवर घडला. अत्यंत शुद्ध प्रेमाच्या उद्रेकानें त्यांच्या तोंडांतून कवित्वमय उद्गार बाहेर पडूं लागले. 'हृदयस्थ ईशमूर्तीच माझ्या मुखानें अभंगवाणी प्रकट करीत आहे,' असें बोवांनी वर्डस्वर्थप्रमा- णेच सांगितलें आहे. ते म्हणतात:-

करितों कवित्व, म्हणाल हे कोणी, ।
नव्हे माझी वाणी पदरींची. ॥ १ ॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार, ।
मज विश्वंभर बोलवितो. ॥ २ ॥


 * “Ah! need I say, dear friend, that to the brim, My heart was full; I made no vows; but vows Were then made for me; bond unknown to me Was given that I should be, else sinning greatly, 3 A dedicated spirit.”.